अकरा गावांत लसीकरणाची तयारी पूर्ण

निमसाखर- केंद्र सरकारच्या गोवर आणि रूबेला लसीकरण मोहिमेची निरवांगी प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गतच्या 11 गावांतील तयारी पूर्ण झाली आहे. येत्या दि. 27 पासून या मोहिमेत नऊ हजार 230 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात येणार आहे, अशी माहिती निरवांगी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत महाजन यांनी दिली. गुरुवारी (22) आरोग्य कर्मचारी, शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा सेविका यांच्या प्रशिक्षण वर्गात डॉ. महाजन यांनी मोहिमेचा आढावा घेतला. त्यानंतर ही माहिती दिली. आरोग्य केंद्राच्या कायंक्षेत्रातील 11 गावांतील जिल्हा परिषदेच्या 41 शाळा, 12 माध्यमिक विद्यालये आणि 35 अंगणवाडी यातील 9 महिन्यांपासून 15 वर्ष वयोगटातील लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात येणार आहे. 27 नोव्हेंबरपासून 28 डिसेंबरपर्यंत मोहीम राबविण्यात येणार आहे. 30 अंगणवाडी सेविका 15 आरोग्य कर्मचारी यांची पाच टीममध्ये विभागणी करण्यात आली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)