अकरा किलोमीटर नॉनस्टॉप रांगोळी काढण्याचा विश्वविक्रम

चिंबळी ः आपल्या रांगोळीच्या कलेतून संत ज्ञानेश्वरमहाराज पायी वारी पालखी सोहळ्यात रांगोळीच्या पायघड्या साकारणारी रांगोळीकार राजश्री जुन्नरकर, भोसरी (पुणे) हिने गुजरात राज्यातील सुरत येथे “सुरती राजा’च्या मिरवणुकीत नॉनस्टॉप अकरा किलोमीटर रांगोळीच्या पायघड्या घालत नवा विश्व विक्रम केला आहे. तिच्या या विक्रमाची नोंद गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड या संस्थेने घेतली आहे. यासाठी तिने पंचवीस पोती पांढरी रांगोळी आणि ऐंशी किलो कलर रांगोळी वापरली. गणपती प्रतिष्ठापनेच्या दिवशी शुक्रवारी (दि. 25) तिने सायंकाळी पाच वाजता सुरतमधील आढावा गेट, वनीता विश्राम ग्राऊंड येथून रांगोळी साकारण्यात सुरुवात केली, ती रात्री दहा वाजता सरसाना ढोम येथे पूर्ण झाली. सदर मार्गावर गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या सदस्यांनी गाडीच्या साहाय्याने रांगोळीचे मोजमाप केले. राजश्री जुन्नरकर हिचे मूळ गाव जुन्नर आहे. रांगोळीच्या माध्यमातून राजश्री भोसरी, आळंदीसह राज्यात आणि परराज्यात नावलौकिक मिळविला आहे. राजश्रीला आतापर्यंत विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून या विश्वविक्रमामुळे तिच्या कलेवर कौतुकाची मोहर उमटली आहे

  • गुजरात येथील सुरत शहरात सुरती राजा म्हणून गणपती विराजमान झाला असून, या गणपतीची मूर्ती 153 फूट उंच आहे.त्या समोरील मूषकराज 63 फूट असून गणपतीच्या पायातील मोजडी 22 फूट,16 फूट ढोलकी उभारण्यात आली आहे. या सर्वांची विश्वविक्रमात नोंद घेण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)