अकरावी प्रवेशासाठी आज सर्वत्र मार्गदर्शन वर्ग

आजपासून भाग दोन भरण्यास सुरुवात : आतापर्यंत 73 हजार विद्यार्थ्यांची नोंदणी

प्रभात वृत्तसेवा
पुणे, दि.13 – अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून आतापर्यंत 73 हजार 925 विद्यार्थ्यांनी पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातून नोंदणी केली आहे. अकरावी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन वर्ग भरविण्यात येणार आहे. यामध्ये त्यांना अर्ज कसा भरावा याबाबचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. अकरावीसाठी उपलब्ध असणाऱ्या जागांची माहितीही बुधवारी जाहीर केली जाणार असल्याची माहिती अकरावी केंद्रीय प्रवेश समितीच्या सचिव मिनाक्षी राऊत यांनी दिली.
अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर आता अकरावी अर्ज भरताना अनेकदा चुकीचे पसंतीक्रम टाकल्याने विद्यार्थ्यांना चुकीचे महाविद्यालय मिळणे, एखादा खास विषय हवा असेल तर तो पसंतीक्रम टाकलेल्या महाविद्यालयात नसणे, दूर अंतरावरचे महाविद्यालय मिळणे अशा अनेक अडचणी गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर समोर येतात. त्यामुळेच यासाठी विद्यार्थ्यांनी अर्ज भरतानाच नेमकी कोणती काळजी घ्यावी यासाठी अकरावी केंद्रीय प्रवेश समितीकडून बुधवारी सर्वत्र उद्बोधन वर्ग घेण्यात येणार आहे. यामध्ये पालक व विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

महाविद्यालयांची नोंदणी पूर्ण झालेली आहे. मात्र एकूणच प्रवेश प्रक्रियेत उपलब्ध जागांची संख्या बुधवारी जाहीर करण्याचे ठरले आहे. त्यामुळे बुधवारी अकरावी प्रवेशासाठी नेमक्‍या कोणत्या शाखेंतर्गत किती जागा उपलब्ध आहेत, कोट्यातील जागा किती आहेत याची सविस्तर माहिती जाहीर केली जाईल.
– मिनाक्षी राऊत, सचिव, अकरावी केंद्रीय प्रवेश समिती

आतापर्यंत 73 हजार विद्यार्थ्यांची नोंदणी
अकरावी प्रवेशासाठी पुणे व पिंपरी-चिंचवडमधील 73 हजार 925 विद्यार्थ्यांनी अकरावी प्रवेशासाठी नोंदणी केली असून त्यापैकी 33 हजार 353 विद्यार्थ्यांचे अर्ज तपासून झाले आहेत; तर 22 हजार 919 विद्यार्थ्यांचे अर्ज आपोआपच तपासून झाले आहेत. 17 हजार 653 विद्यार्थ्यांचे अर्ज अजूनही तपासणे बाकी आहेत.

13 जून रोजी होणारे मार्गदर्शन केंद्र
झोनचे नाव उद्बोधन वर्गाचे ठिकाण वेळ
पुणे शहर विभाग, पर्वती, धनकवडी, स्वारगेट आबासाहेब गरवारे महाविद्यालय, असेब्ली हॉल 11 ते 1
कर्वेनगर व कोथरुड विभाग डॉ.श्‍यामराव कलमाडी ज्युनियर कॉलेज, एरंडवणे 2 ते 4
सिंहगड विभाग रावसाहेब पटवर्धन माध्यमिक विद्यालय, दांडेकर पूल 1 ते 2
कॅम्प व येरवडा विभाग आबेदा इनामदार महाविद्यालय, असेंब्ली हॉल 3 ते 4
हडपसर विभाग साधना मुलांचे महाविद्यालय, कर्मवीर सभागृह 11 ते 1
शिवाजीनगर, औंध व पाषाण विभाग मॉर्डन विद्यालय, असेब्ली हॉल, शिवाजीनगर 3 ते 4
पिंपरी, भोसरी, चिंचवड, निगडी विभाग म्हाळसाकांत कनिष्ठ महाविद्यालय, आकुर्डी 11 ते 1

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)