अकरावी प्रवेशातील सहाव्या फेरीला मुदतवाढ

संग्रहित छायाचित्र

पुणे- अकरावी प्रवेशाच्या सहाव्या फेरीतील प्रवेशाची मंगळवारी शेवटची मुदत होती. मात्र शिक्षण विभागाने ही मुदत वाढविली असून आता विद्यार्थ्यांना 31 ऑगस्टपर्यंत प्रवेश घेता येणार असल्याची माहिती अकरावी केंद्रीय प्रवेश समितीच्या सचिव मिनाक्षी राऊत यांनी दिली आहे. दरम्यान दहावी पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून या विद्यार्थ्यांसाठी समितीकडून वेगळी फेरी जाहीर करण्यात येणार आहे. या विद्यार्थ्यांनी आपली ऑनलाईन गुणपत्रिकेची प्रिंट स्वयंसाक्षाकित करुन प्रवेश घ्यावा असे आवाहन राज्य शिक्षण मंडळाकडून करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)