अकरावी प्रवेशाच्या तिसऱ्या यादीत 17 हजार प्रवेश

साडेपाच हजार विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय
पुणे – अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या तिसऱ्या फेरीत 17 हजार 152 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे; तर 5 हजार 746 जणांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले आहे, अशी माहिती अकरावी केंद्रीय प्रवेश समितीच्या प्रभारी अध्यक्षा मिनाक्षी राऊत यांनी दिली.
पुणे व पिंपरी-चिंचवड येथील महाविद्यालयांतील अकरावीचे ऑनलाईन प्रवेश सध्या सुरू असून मंगळवारी सकाळी अकरा वाजता ऑनलाईन पध्दतीने तिसरी गुणवत्ता यादी जाहीर झाली. यात प्रवेश मिळालेल्यांनी आजपासूनच प्रवेश घेण्यास सुरुवात केली असून पहिल्याच दिवशी 1 हजार 818 जणांनी महाविद्यालयात जाऊन आपले प्रवेश निश्‍चित केले आहेत. तिसऱ्या यादीत महाविद्यालय मिळालेले विद्यार्थी 31 जुलै ते 2 ऑगस्टदरम्यान सकाळी 11 ते 5 या वेळात प्रत्यक्ष जाऊन प्रवेश घेऊ शकतात.
तिसऱ्या फेरीनंतरचे कट ऑफ 3 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता अकरावीच्या संकेतस्थळावर जाहीर होणार आहे. त्यानुसार 3 व 4 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 6 या वेळात विद्यार्थी भाग एक व भाग दोन भरू शकणार आहेत. तर, चौथी यादी 7 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता जाहीर करण्यात येणार असल्याचे राऊत यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)