अकरावी प्रवेशाच्या जागा अखेर जाहीर

पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये 285 महाविद्यालयांमध्ये 96 हजार 320 जागा
मागील वर्षीच्या तुलनेत पाच हजारांनी जागा वाढल्या
पुणे – अकरावी प्रवेशासाठी कोणत्या शाखेसाठी किती जागा उपलब्ध आहेत याची माहिती अद्याप केंद्रीय प्रवेश समितीकडून जाहीर करण्यात आली नव्हती. मात्र अखेर गुरुवारी सायंकाळी समितीने ही यादी जाहीर केली असून पुणे व पिंपरी चिंचवडमधील 285 महाविद्यालयांमध्ये एकूण 96 हजार 320 जागा उपलब्ध असल्याचे समितीकडून सांगण्यात आले आहे. मागील वर्षी एकूण 91 हजार 670 जागा उपलब्ध होत्या.

अकरावी प्रवेशासाठी बाहेरगावाहून आलेले विद्यार्थ्यांना जर प्रवेश घ्यायचा असेल तर त्यांनी नेमके काय करावे, कोणत्या मार्गदर्शन केंद्रांना भेट द्यावी, माहितीपुस्तिका कुठून घ्यावी याची माहितीच जाहीर न केल्याने विद्यार्थी संभ्रमात होते. मात्र अखेर समितीने संकेतस्थळ तसेच अन्य माहितीही जाहीर केली आहे. त्यानुसार बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना संकेतस्थळावर याबाबची सर्व माहिती उपलब्ध होऊ शकणार आहे. दरम्यान यंदाच्या वर्षीपासून अकरावी समितीने कला व सांस्कृतिक कोट्यांतर्गत दिले जाणारे आरक्षण रद्द केले आहे. विद्यार्थ्यांना दहावीच्या परीक्षेतच हे वाढीव गुण मिळत असल्याने समितीने हा निर्णय घेतला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सर्व महाविद्यालयांना हेल्प डेस्क सुरु करण्याचे आदेश
अकरावी समितीसाठी व महाविद्यालयांसाठी दरवर्षी अकरावीसाठी प्रवेश प्रक्रिया सारखीच असली तरीही विद्यार्थ्यांसाठी मात्र ती दरवर्षी नवी असते. त्यामुळेच विद्यार्थ्यांचे प्रश्‍न सोडविण्याच्या दृष्टीकोनातून प्रत्येक महाविद्यालयाने त्यांच्यासाठी हेल्पडेस्क सुरु करावेत अशा सूचना अकरावी केंद्रीय समितीने केल्या आहेत. हे हेल्पडेस्क सोमवार ते शनिवार सकाळी दहा ते सायंकाळी पाचपर्यंत सुरु ठेवावे असेही सांगण्यात आले आहे.

शुल्क भरताना पालकांना नाहक त्रास नको
अनेक महाविद्यालये विद्यार्थ्यांचे पूर्ण शुल्क घेऊन प्रवेश निश्‍चित करत असताना विद्यार्थ्यांकडून डीडी स्वरुपात शुल्क भरण्याची मागणी करतात. त्यामुळे पालकांना नाहक त्रास होतो. त्यामुळेच विद्यार्थ्यांचे शुल्क हे ऑनलाईन पध्दतीने किंवा तात्पुरत्या स्वरुपात निश्‍चित करुन मग पूर्ण शुल्क भरायला सांगावे. जणेकरुन पालकांना नाहक त्रास सहन करावा लागणार नाही अशाही सूचना समितीने महाविद्यालयांना दिल्या आहेत.

अकरावीसाठी उपलब्ध शाखानिहाय जागांची संख्या
शाखा शाखा संख्या प्रवेश क्षमता
कला (मराठी) 70 8060
कला (इंग्रजी) 61 5940
वाणिज्य (मराठी) 97 13100
वाणिज्य (इंग्रजी) 166 25560
विज्ञान (इंग्रजी) 225 39090
व्यावसायिक शिक्षण (मराठी) 27 3040
व्यावसायिक शिक्षण (इंग्रजी) 17 4570

एकूण जागा 96,320

प्रवेशासाठीचे संकेतस्थळ
https://pune.11thadmission.net/

त्या अनुदानित महाविद्यालयांविरुध्द संघटनेकडे तक्रार करा
अकरावी केंद्रीय प्रवेश समितीने प्रत्येक विनाअनुदानित महाविद्यालयाने किती शुल्क घ्यावे किंवा त्या महाविद्यालयचे शुल्क किती आहे हे माहितीपुस्तिकेत सांगितले आहे. मात्र अनुदानित महाविद्यालयांबाबत कोणतीही ठोस माहिती दिलेली नाही. शासनाच्या नियमानुसार प्रत्येक अनुदानित महाविद्यालयाने 330 ते 390 रुपये शुल्क घेणे अपेक्षित आहे. पुण्यातील अनुदानित महाविद्यालयांनी 360 रुपये शुल्क घेणे अपेक्षित आहे. मात्र जी महाविद्यालये यापेक्षा जास्त शुल्क आकारतील त्यांच्याविरोधात आमच्या संघटनेकडे तक्रार करा अशी भूमिका आता सिस्कॉन या संघटनेने घेतली आहे. त्यासाठी सिस्कॉम, निर्मल इंटरप्राइजेस, शॉप नं 2, श्रीअनिकेत आपार्टमेंट, 292 कसबा पेठ, पुणे 411011 यांच्याकडे तक्रार करावी असे आवाहन संघटनेच्या संचालक वैशाली बाफना यांनी केले आहे. दरम्यान याबाबत पालक व विद्यार्थी शिक्षण विभागाकडेही दाद मागू शकतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)