अकरावी प्रवेशाच्या चौथ्या फेरीत 16 हजार विद्यार्थ्यांना प्रवेश

पुणे,दि.7 – अकरावी प्रवेशाची चौथी फेरी मंगळवारी जाहीर करण्यात आली. या फेरीत 16 हजार 634 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले आहेत त्यातील 6 हजार 13 विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले आहे. तर अद्यापही अनेक विद्यार्थी हे प्रवेशपासून वंचित आहे. मात्र पाचवी फेरी घ्यायची की नाही याचा निर्णय शासनाकडून निर्णय आल्यानंतरच घेण्यात येईल असे अकरावी केंद्रीय प्रवेश समितीच्या प्रभारी अध्यक्ष मिनाक्षी राऊत यांनी सांगितले.
अकरावी प्रवेशाच्या आतापर्यंत तीन फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. मात्र या तीनही फेऱ्यांमध्ये साधारण 30 ते 35 हजार विद्यार्थ्यांचेच प्रवेश पूर्ण झाले आहेत अन्य विद्यार्थ्यांना अद्यापही महाविद्यालय मिळालेले नाही. दरम्यान चार फेऱ्या पूर्ण झाल्या तरीही अद्यापही कट ऑफ कमी झालेला दिसत नाही. उलट काही महाविद्यालयांचा कट ऑफ वाढल्याचे दिसत आहे. चौथ्या फेरीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांनी 7 ते 9 ऑगस्टदरम्यान त्या त्या महाविद्यालयात जाऊन प्रवेश घ्यायचे आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)