अकरावीच्या 40 टक्‍के माहितीपुस्तिकांचे वाटप

मनपा हद्दीबाहेरच्या विद्यार्थ्यांना झोन केंद्रांवर मिळणार माहितीपुस्तिका
पुणे – अकरावी प्रवेशाच्या माहितीपुस्तिकांचे वाटप दहावीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेतच करण्यास सुरुवात केली असून आतापर्यत साधारण 40 टक्‍के माहितीपुस्तिकांचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती अकरावी केंद्रीय प्रवेश समितीच्या सचिव मिनाक्षी राऊत यांनी दिली. मनपा हद्दीतील विद्यार्थ्यांना आपापल्या शाळांमध्येच या पुस्तिका मिळणार आहेत. तर मनपा हद्दीबाहेरच्या विद्यार्थ्यांना समितीच्या नऊ झोनमध्ये ही माहितीपुस्तिका उपलब्ध होणार आहे. यंदाच्या माहितीपुस्तिकेत महाविद्यायांची नावे जाहीर करण्यात आलेली नाहीत. ती यादी नंतर संकेतस्थळावर जाहीर केली जाणार आहे. सध्या माहितीपुस्तिकेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना लॉग इन आयडी व पासवर्ड देण्यात येत आहे. त्याचा वापर करुन नंतर विद्यार्थी आपला अर्ज भरु शकतील. ही माहितीपुस्तिका दीडशे रुपयांना शाळांमध्ये उपलब्ध करुन दिली आहे.

यासाठी एक लाख माहितीपुस्तिकांची छपाई करण्यात आली असून त्यातील 40 हजार माहितीपुस्तिका शाळांमध्ये पोहचल्या असल्याचे राऊत यांनी सांगितले. दरम्यान मनपा हद्दीबाहेरच्या विद्यार्थ्यांना एस.पी कॉलेज, आबासाहेब गरवारे कॉलेज, शाहू विद्या मंदिर, वसंतराव सणस हायस्कूल, नौरासजी वाडिया कॉलेज, अकुताई कल्याणी साधना शाळा, फर्गसन कॉलेज, जयहिंद कॉलेज पिंपरी व म्हाळसाकांत विद्यालय आकुर्डी या ठिकाणी माहितीपुस्तिका उपलब्ध होतील. दरम्यान विद्यार्थ्यांनी सध्या केवळ माहितीपुस्तिकेचे व्यवस्थित वाचन करुन प्रवेशाची माहिती व्यवस्थित वाचून घ्यायची आहे. प्रवेशाची पुढील रुपरेषा लवकरच जाहीर करण्यात येईल असे राऊत यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)