साडेतीन हजार विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय
पुणे- अकरावी प्रवेशाची विशेष फेरीची गुणवत्ता यादी जाहीर झाली असून या यादीमध्ये 11 हजार 47 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले आहेत. यामध्ये साडेतीन हजार विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले असल्याची माहिती अकरावी केंद्रीय प्रवेश समितीच्या प्रभारी अध्यक्षा मिनाक्षी राऊत यांनी दिली.
अकरावी प्रवेश समितीकडून आतापर्यंत चार नियमित तर पाचवी विशेष फेरी घेण्यात आली आहे. आतापर्यंत नियमित व कोट्यातील प्रवेश धरुन एकूण 58 हजार विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे. तर जवळपास सतरा हजार विद्यार्थी हे अद्यापही प्रवेश प्रक्रियेबाहेर होते. मात्र आता विशेष फेरीत 11 हजार विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले आहेत. परंतु अन्य विद्यार्थ्यांसाठी आणखी एक विशेष फेरी घेणे अकरावी समितीला भाग पडणार आहे. या 11 हजार प्रवेशामध्ये 710 प्रवेश कला शाखेचे, 5 हजार 206 प्रवेश वाणिज्य शाखेचे, विज्ञान शाखेत 4 हजार 892 तर एचएसव्हीसीचे 239 प्रवेश आहेत. दुसऱ्या पसंतीचे महाविद्यालय मिळणाऱ्यांची संख्याही जास्त असून 2 हजार 451 विद्यार्थ्यांना दुसऱ्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले आहे.

पुरवणी परीक्षेतील विद्यार्थ्यांचे निकालही लवकरच
दहावीच्या पुरवणी परीक्षेचे निकालही लवकरच जाहीर केले जाणार आहेत. त्यामुळे अकरावीच्या पुढच्या फेरीत याही विद्यार्थ्यांचा समावेश असण्याची शक्‍यता आहे. दरम्यान समितीने अद्याप पुढच्या फेरीतील प्रवेशाचे नियोजन जाहीर केलेले नाही. दरम्यान या पहिल्या विशेष फेरीतील प्रवेशासाठी 18 ते 21 ऑगस्टपर्यंची मुदत देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)