अकरावीच्या चौथ्या फेरीत आठ हजार प्रवेश

पुणे, दि.10 – अकरावी प्रवेशाची चौथी फेरीही पूर्ण झाली असून चौथ्या फेरीत 7 हजार 728 विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले असल्याची माहिती अकरावी केंद्रीय प्रवेश समितीकडून देण्यात आली आहे. दरम्यान, विशेष फेरीसाठी उर्वरित सर्व विद्यार्थी अर्ज करू शकणार असल्याने या विशेष फेरीतच सर्वाधिक प्रवेश होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.
अकरावी केंद्रीय प्रवेश समितीने चौथ्या फेरीतील प्रवेशाला एक दिवस मुदतवाढ दिली होती. त्यानुसार 10 ऑगस्टपर्यंत चौथ्या फेरीतील सर्व प्रवेश पूर्ण झाले. तर, 8 हजार 847 विद्यार्थ्यांनी प्रवेश मिळूनही प्रवेश घेतला नसल्याची माहिती समितीकडून देण्यात आली. दरम्यान, अकरावी समितीकडून नियमितपणे घेण्यात आलेल्या फेऱ्यांमध्ये निम्मेच प्रवेश झाल्याचे दिसून आले असून आता विशेष फेरीच्या माध्यमातून उर्वरित प्रवेश करावे लागणार आहेत. या फेरीनंतर अल्पसंख्यांक महाविद्यालये तसेच अन्य महाविद्यालयेही आपले कोट्यातील प्रवेश नियमित जागांमध्ये विलिन करू शकतात. त्यामुळे नियमित प्रवेशाच्या जागा वाढणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)