अकरावीच्या चौथ्या फेरीतील प्रवेशासाठी मुदतवाढ मिळणार

अजूनही हजारो विद्यार्थी, पालक प्रवेशाच्या प्रतिक्षेत
प्रभात वृत्तसेवा
पुणे, दि.8 – अकरावी प्रवेशाची रेल्वेगाडी एक एक डबे जोडत लांबतच चालल्याचे सध्या चित्र आहे. चौथ्या फेरीअंती अजून निम्मेच प्रवेश झालेले असताना आता चौथ्या फेरीलाही मुदतवाढ मिळण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. त्यामुळे अद्याप कुठेही प्रवेश न मिळालेले विद्यार्थी व त्यांचे पालक मात्र चिंतेत आहेत.
ऑगस्ट महिना उजडला तरीही अद्याप पुणे व पिंपरी-चिंचवडमधील जवळपास निम्म्या मुलांचे प्रवेश बाकी असल्याने विद्यार्थी व पालक चिंतेत आहेत. ज्या महाविद्यालयांत सत्तर टक्‍क्‍यांहून अधिक प्रवेश झालेत अशांना महाविद्यालय सुरू करायला परवानगी दिल्यामुळे अनेक मुलांना शैक्षणिक नुकसान सहन करावे लागत असल्याचे चित्र आहे.
अकरावी प्रवेशाच्या आतापर्यंत चार फेऱ्या झाल्या असून चौथ्या फेरीतील प्रवेश 9 ऑगस्टपर्यंत घेणे अपेक्षित होते. मात्र आता मराठा आरक्षण मोर्चामुळे गुरुवारी सर्व महाविद्यालये बंद असल्याकारणाने या प्रवेशाला अर्थातच मुदतवाढ द्यावी लागणार आहे. त्यातच अद्यापपर्यंत पाचवी फेरी कधी घ्यायची याच्या कोणत्याच मार्गदर्शक सूचना शासनाकडून न आल्याने शहरातील विद्यार्थी चांगलेच काळजीत पडले आहेत. याबाबतचे सुधारित वेळापत्रक गुरुवारी जाहीर होईल असे अकरावी केंद्रीय प्रवेश समितीकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, आतापर्यंत चार फेऱ्यांत किती प्रवेश झाले, अल्पसंख्यांकांचे किती प्रवेश झाले याची आकडेवारी समितीकडून जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे किती विद्यार्थी प्रवेशापासून वंचित आहेत हा आकडाही समोर आलेला नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)