12 लाख रुपयांची ब्राऊन शुगर जप्त

पुणे- ब्राऊन शुगर विक्रीसाठी आलेल्या तरुणाला गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून तब्बल 12 लाख 69 हजार रुपये किंमतीची 255 ग्रॅम ब्राऊन शुगर जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि.31) रात्री इंदिरानगर झोपडपट्टी येथील रस्त्यावर करण्यात आली.

अशोक अर्जुन जाधव (वय 34, रा. इंदिरानगर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक हा पुणे शहरात मोठ्या प्रमाणात ब्राऊन शुगरची विक्री करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून इंदिरानगर येथील झोपडपट्टीमध्ये अशोकला अटक करण्यात आली. त्याला ब्राऊन शुगरचा पुरवठा करणारा कोण आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)