अंभोरे येथे उभारण्यात येणार विठ्ठल – रुक्मिणीचे भव्य मंदीर

  रणजितसिंह देशमुख यांचा ग्रामस्थांसमवेत पुढाकार

संगमनेर – तालुक्यातील अंभोरे गावामध्ये महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणारे विठ्ठल-रुक्मिणीचे भव्य नुतन मंदीर बांधण्याचा संकल्प ग्रामस्थांनी केला आहे. राजहंस दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख यांच्या पुढाकाराने व ग्रामस्थांच्या सहकार्याने या मंदीराची उभारणी करण्यात येणार आहे.  अंभोरे गावच्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता बुधवारी ह.भ.प माउली महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली. सप्ताहाच्या निमीत्ताने गावात प्रतिपंढरी निर्माण झाली होती. याप्रसंगी रणजितसिंह देशमुख यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भाविकांपुढे बोलतांना रणजितसिंह देशमुख म्हणाले कि, अंभोरे गावात अनेक वेळा मंदीर बांधणेबाबत चर्चा झाली परंतु योग जुळत नव्हता. सप्ताहाच्या निमीत्ताने मंदीर बांधण्याचा निर्णय सर्वांनी एकत्रितपणे घेतल्याने या कामाचा लवकरच शुभारंभ करण्यात येईल. उपस्थित ग्रामस्थांनी देशमुख यांच्या समवेत मंदीर निर्मीतीसाठी पुढाकार घेत सहकार्य करण्याचे ठरविले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
8 :thumbsup:
3 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)