अंबेनळी घाटात आढळले मायलेकाचे जळालेले मृतदेह

आत्महत्या की घातपात, पोलिसांचा शोध सुरु
महाबळेश्वर,  (प्रतिनिधी) – अंबेनळी घाटात पायटा गावाच्या हद्दीत एका महिलेसह मुलाचा अर्धवट अवस्थेत जळालेला मृतदेह मंगळवारी आढळून आला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या दोन्ही मृतदेहांची ओळख पटली असून हा घातपाताचा प्रकार आहे की आत्महत्या याबाबत पोलादपूर पोलीस तपास करत आहेत.
सहलीसाठी महाबळेश्‍वरला निघालेल्या दापोली येथील कृषी कोकण विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांची बस अंबेनळी घाटात सहाशे फुट खोल दरीत कोसळून 32 जणांचा जागीच मृत्यु झाला होता. ही घटना ताजी असतानाच मंगळवारी पुन्हा अंबेनळी घाटात अर्धवट जळालेले दोन मृतदेह सापडल्याची घटना उघडकीस आली. या घटनेमुळे पोलीस यंत्रणा सतर्क झाली. तपासाला वेग आला आहे. अंबेनळी घाटात पायटा गावाच्या हद्दीत महाबळेश्वर-पोलादपूर रस्त्याच्या कडेला पाच ते सहा फुट अंतरावर एका आंब्याच्या झाडाखाली महिलेसह लहान मुलाचा अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह असल्याची माहिती पोलादपूर पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तातडीने घटना स्थळाकडे धाव घेतली. घटना स्थळावर उत्तर प्रदेश पासिंग असलेली एक स्कूटी उभी होती. तसेच जवळच ज्वलनशिल पदार्थ असलेल्या बाटल्या आढळुन आल्या. त्यामुळे या दोघांना जाळुन त्यांचा खुन करण्यात आला की, महिलेने आपल्या मुलासह पेटवून घेवुन आत्महत्या केली? याबाबत पोलीस तपास गेले आहेत.
दरम्यान या दोन्ही मृतदेहांची ओळख पटली असल्याची माहिती पोलादपूर पोलिसांनी दिली. महाड शहर पोलिस ठाण्यात सोमवारी रात्री एक महिला आपल्या अडीच वर्षांच्या मुलासह बेपत्ता झाल्याची फिर्याद दाखल करण्यात आली आहे. या फिर्यादी नुसार महिलेचे नाव शितल ललित गंगवार (वय 34) मुलगा देवांक ललित गंगवार (वय अडीच वर्षे, रा 105 नोबेल ऑरचिड बी वींग सुंदवाडी महाड) असे आहे. हे दोघे कोणालाही काहीही न सांगता घरातून निघुन गेले आहेत, अशी फिर्याद शितलचा पती ललित तेजबहादूर गंगवार यांनी दाखल केली होती. ललित हा मुळचा उत्तर प्रदेश येथील राहणार आहे.
या घटनेची माहिती पोलादपूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रकाश पवार यांनी आपल्या कर्मचारी यांचे पथक घेवून घटनास्थळावर धाव घेतली. अर्धवट जळालेले दोन्ही मृतदेहांचा पंचनामा करून दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पोलादपूर ग्रामिण रूग्णालयात दाखल केले आहेत. दरम्यान, महाडचे उपविभागीय अधिकारी प्रांजली सोनावणे यांनीही घटनास्थळी भेट देवून तपासाबाबत माहिती घेतली.

What is your reaction?
5 :thumbsup:
1 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
2 :cry:
1 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)