अंबिका महिला सहकारी बॅंकेस उत्कृष्ट कामाबद्दल विशेष पुरस्कार

नगर – नगर जिल्हा नागरी सहकारी बॅंक्‍स असोसिएशनच्या 34 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सर्वोत्कृष्ट कामकाजाबद्दल दिल्या जाणाऱ्या पुरस्काराचा मान दि अंबिका सहकारी महिला बॅंकेस मिळाला असून, यामध्ये बॅंकेचा एनपीए शुन्य टक्‍के असल्याबाबत नागरी बॅंक असोसिएशनतर्फे विविध स्तरावरील प्रशिक्षण कार्यशाळेमध्ये सर्वाधिक प्रशिक्षण घेतल्याबद्दल हा पुरस्कार बॅंकेस मिळाला असल्याची माहिती बॅंकेच्या अध्यक्षा शोभा खरपुडे यांनी दिली. हा पुरस्कार अध्यक्षा खरपुडे व उपाध्यक्षा भारती आठरे यांनी संचालक मंडळाच्या समवेत स्वीकारला.

याप्रसंगी बॅंकेच्या संस्थापिका प्रा. मेधाताई काळे म्हणाल्या, “”आज बॅंक ग्राहक सेवेसाठी सर्व बाजूंनी सक्षम असून तंत्रज्ञान, कर्जवितरण, ठेवी स्वीकारणे, वसुली, व्यवसाय वाढ यामध्ये बॅंक कोठेही कमी राहिलेली नाही.” वर्षाच्या आरंभी व्यवसायाची उद्दिष्टे ठरवून ध्येयधोरणाची अंमलबजावणी व पूर्तीसाठी बॅंकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश गायकवाड व कर्मचारी यांचेही कामकाज मोलाचे आहे. या सर्वांमुळे बॅंकेस हा पुरस्कार मिळाला असल्याची भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली. याप्रसंगी बॅंकेच्या संचालिका डॉ. क्रांती अनभुले, आशा मिस्कीन, प्रा. पुष्पलता वाघ, प्रा. डॉ. संध्या जाधव, डॉ. लता फिरोदिया, ऍड. शारदा लगड, सविता गांगर्डे, सरोजिनी चव्हाण, तज्ज्ञ संचालक रमेश परभाणे, असोसिएशनचे अध्यक्ष रवींद्र लोहाडे, उपाध्यक्ष नाथा राऊत, कार्यकारी संचालक अशोक कुरपट्टी व विविध बॅंकांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)