अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी; कोल्हापुरात जल्लोष

कोल्हापूर – करवीर निवासिनी श्री  अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नेमावेत असं विधेयक विधानसभा आणि विधानपरिषदेत मंजूर झाल्यावर कोल्हापूरात अंबाबाई भक्त मंडळाच्या वतीन जल्लोष साजरा करण्यात आलाय.  कोल्हापुरातल्या ऐतिहासिक दसरा चौकात शाहू महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून, ढोलताशांच्या गजरात साखर पेढे वाटून आनंद उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी समिती सदस्यांनी ढोलताशांच्या गजरात डान्स केला तर महिलानी फुगडीचा फेर धरला.

करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीला घागरा चोली पेहराव केल्यानंतर अंबाबाई भक्त मंडळ आणि भाविकांच्या वतीने पुजारी हटाव या आंदोलनाला सुरवात झाली होती. पंढरपूर, शिर्डी मंदिराच्या धर्तीवर अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नेमण्यात यावेत, यासाठी कोल्हापूरात हे जनआंदोलन करण्यात आल होत. आता पगारी पुजारी कायदा विधानसभा आणि विधानपरिषद या दोन्ही सभागृहात मंजूर झाल्यावर कोल्हापूरात अंबाबाई भक्त मंडळ आणि भाविकांनी दसरा चौकात साखर वाटप करत ढोलताशांच्या तालावर नृत्य केलं.

दोन्ही सभागृहात पगारी पुजाऱ्या सोबत पन्नास टक्के महिला पुजारीचा समावेश करण्यात येणार असल्याने, महिलावर्गातून या निर्णयाचे स्वागत केले जात आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे देवीची पूजा करण्याचा मान महिलांनाही मिळणार असल्याने महिला वर्गातूनही या निर्णयाच स्वागत करण्यात आलंय, यावेळी कोल्हापूरच्या महापौर स्वाती येवलुजे यांनी फुगडी खेळत जल्लोष केलाय.सरकारी पुजारी नेमण्याचा निर्णयामुळं कोल्हापुरात आनंदाचे वातावरण निर्माण झाल आहे. तसंच निर्णयाचे लवकर कायद्यात रूपांतर करून कायदा लागू व्हावा अशी मागणी देखील करण्यात आलीय.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)