अंबाबाईच्या किरणोत्सव सोहळ्यास सुरुवात

कोल्हापूर – करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील किरणोत्सव सोहळ्याला आज पासून प्रारंभ झाला आहे. किरणोत्सवाच्या पहिल्याच दिवशी मावळत्या सूर्य किरणांनी देवीच्या खांद्याच्या वर आणि कंठा पर्यंत स्पर्श करत किरणे लुप्त झाली. सायंकाळी 6 वाजून 19 मिनिटांनी किरणोत्सव सोहळा पार पडला.

करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात दरवर्षी किरणोत्सव सोहळा पार पडत असतो. आज या सोहळ्याचा पहिला दिवस होता. किरणोत्सव सोहळ्याच्या पहिल्याच दिवशी सूर्याची मावळतीची किरणे महाद्वार आणि गरुड मंडपातून मंदिरात पोहचली. हळूहळू या किरणांनी गाभाऱ्यात प्रवेश करून देवीच्या मूर्तीचा चरणस्पर्श केला. पहिल्याच दिवशीचा किरणोत्सव पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.हा सोहळा अजून दोन दिवस चालणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)