अंबानी कुटुंंबीयांंकडून आराध्या बच्चनचे खास स्वागत

देशातील सर्वात मोठे आणि श्रीमंत उद्योगपती असलेल्या मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. हिरे व्यावसायिक रसेल मेहता यांच्या कन्या श्लोका मेहतासोबत साखरपुडा झाला. हा साखरपुडा समारंभ २४ मार्च रोजी गोव्यात संपन्न झाला. गोव्यात पार पडलेल्या या सेरेमनीनंतर अंबानी यांनी मुंबईत एक ग्रँड पार्टी दिली. या पार्टीत बॉलिवूड सेलिब्रेटींसह क्रिकेटर्सनेही हजेरी लावली. दरम्यान, या सर्वात आकर्षणाचे केंद्र ठरले ती म्हणजे लिटील आराध्या…

ऐश्वर्या राय बच्चन तिच्या मुलीसह अंबानीच्या घरी आयोजित पार्टीमध्ये पोहचली होती. या पार्टीला आराध्या बच्चनने गुलाबी रंगाचा फ्रॉक घातला होता. आराध्या बच्चन ही धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल शाळेत शिकते. या शाळेच्या संस्थापिका आणि चेअरपर्सन नीता अंबानी आहेत. मुकेश अंबानीच्या आई कोकिलाबेन या आराध्याशी फार जवळ आहेत. त्यांचे उत्तम  बॉन्डिंग आहे. आराध्याला चॉकलेट, टॉफी काहि गिफ्ट आणि फुगे देऊन स्वागत करण्यात आले. एरवीदेखील जेव्हा आराध्या अंबानी कुटुंबीयांना भेटते तेव्हादेखील तिला चॉकलेट मिळते. परंतु, तिच्या या स्वागतामुळे आराध्या जाम खुश झाल्याचे दिसले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
1 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)