अंबानी आशिया खंडात सर्वाधिक श्रीमंत 

नवी दिल्ली: रिलायन्स इंडस्ट्रिजने 11 वर्षांच्या कालावधीनंतर व्यापार क्षेत्रामध्ये गुरुवारी दुसऱ्यांदा 100 अब्ज डॉलर्सचा आकडा पार केला आहे. त्यामुळे अंबानी आशिया खंडातील सर्वांत श्रीमंत व्यक्‍ती झाले आहेत. पहिल्या क्रमांकावर असलेले चीनचे जॅक मा आता दुसऱ्या क्रमांकावर गेले आहेत. नव्या हिशेबानुसार अंबानी यांची मालमत्ता यावर्षी वाढून 44.3 अब्ज डॉलर झाली आहे. तर मा यांची मालमत्ता 44 अब्ज डॉलर आहे. या वर्षात मुकेश अंबानी यांच्या मालमत्तेत 4 अब्ज डॉलरची भर पडली असतानाच मा यांच्या मालमत्तेत मात्र 2018 मध्ये आतापर्यंत 1.4 अब्ज डॉलरची घट झाली आहे. अंबानी लवकरच ई-कॉमर्स क्षेत्रातही प्रवेश करणार आहेत. त्यानंतर त्यांची संपत्ती आणखी वाढणार आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)