अंबानीच्या पार्टीमध्ये “बॉयफ्रेंड’सोबत प्रियांकाची हजेरी

भारतातील सर्वाधिक श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानीचा मुलगा आकाश अंबानी याच्या प्री-एंगेजमेंट पार्टीचे आयोजन गुरुवारी मुंबईस्थित एंटीलिया येथे करण्यात आले होते. आकाश अंबानी आणि श्‍लोका मेहता यांच्या या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी बॉलीवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमात “देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा हिच्याकडे मीडियाचे लक्ष्य होते. जी या सोहळ्यात आपला बॉयफ्रेंड निक जोनाससोबत हजर होती.

या पार्टीची हाय-लाइट प्वाइंट बनलेली प्रियांका-निकची जोडी सर्वांचे लक्ष्य वेधून घेत होती. याप्रसंगी प्रियांकाने डिझायनर अबु जानी आणि संदीप खोसलाच्या रेड ऍण्ड सिल्वर साडीमध्ये दिसली, तर निक ब्ल्यू सूटमध्ये दिसला. या कपलने मीडियाला कॅमेऱ्यासमोर पोजही दिल्या. याशिवाय आलिया भट, रणबीर कपूर, डायरेक्‍टर अयान मुखर्जी यांनीही हजेरी लावली होती. तसेच बॉलीवूडचा बादशाह शाहरूख खान आपली पत्नी गौरी खान, तर मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने पत्नी अंजलीसह हजेरी लावली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, आकाश अंबानी आणि श्‍लोका मेहता यांचा साखरपुडा शनिवार, दि. 30 जून रोजी होणार आहे. परंतु लग्नाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)