अंबानींकडून आमिरला महाभारतासाठी 1000 कोटींचे बजेट

महाभारतावर चित्रपट करण्याची आमिर खानचे स्वप्न होते. त्याचे हे स्वप्न सत्यात अवतरणार आहे. आमिर आपल्या ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ या चित्रपटानंतर महाभारतावार आधारित फिल्म सिरीजला सुरूवात करेल. त्याच्या अंदाजानुसार महाभारतासारखा प्रचंड विस्तार असलेल्या विषयाला एकाच चित्रपटामध्ये सामावता येणे कठीण आहे. त्यासाठी किमान 3 ते 5 चित्रपटांची सिरीजच करायला लागेल. एवढ्या मोठ्या प्रोजेक्‍टचे प्रॉडक्‍शन करायचे म्हणजे भरपूर वेळ आवश्‍यक आहे. त्यासाठी आमिर खानने आपल्या करिअर लाईफमधील 10 ते 15 वर्षे राखीव ठेवली असल्याचे म्हटले आहे. प्रत्येक चित्रपटाचे दिग्दर्शन वेगवेगळ्या दिग्दर्शकाकडून होणार आहे. स्वतः आमिर मात्र पाचही भागांशी संबंधित राहणार आहे.

या चित्रपटाची निर्मिती देशातील सर्वात मोठे उद्योगपती मुकेश अंबानी करणार आहेत. या सीरीजसाठी 1000 कोटींहुन अधिकचे बजेट असेल. या जबरदस्त बजेटसह हा भारतीय चित्रपटांमधील सर्वात मोठा चित्रपट असल्याचे बोलले जात आहे. हा चित्रपटा प्रसिद्ध हॉलिवूड सीरीजच्या ‘द लॉड्‌स ऑफ द रिंग’ आणि ‘गेम ऑफ थ्रॉन्स’ यांच्या प्रॉडक्‍शन व्हॅल्यूवर आधारीत असेल. सध्या 1000 कोटींचे बजेट असलेल्या महाभारत सीरीजमुळे सर्वत्र चर्चा रंगू लागल्या आहेत. चित्रपटाची संहिता पाहून दिग्दर्शक तीन ते पाच फिल्म सीरीज बनवण्याचा विचार करत आहेत. त्याचबरोबर महाभारताची रुपरेखा लिहिण्यासाठी आंतरराष्ट्रीय लेखकांची मदत घेतली जाईल.

यावर्षी दिवाळीपर्यंत आमिरचा “ठग्ज ऑफ हिंदुस्थान’ रिलीज होईल. त्यामध्ये त्याच्याबरोबर कतरिना कैफ आणि आमिताभ बच्चनही असणार आहेत. “ठग्ज…’ रिलीज झाल्यावर लगेचच आमिर महाभाअरताच्या कामाला लागणार आहे. आता तर या सिरीजच्या प्री प्रॉडक्‍शनच्या कामालाही सुरूवात झाली आहे. पुण्यातल्या ग्रंथालयांमध्ये बसून महाभारतावरच्या सर्व पुस्तकांच्या आधारे रिसर्चही सुरू झाला आहे. त्यामुळे आमिरने लगेचच कोणताही सिनेमा साईन केलेला नाही. या सिरीजमध्ये आमिर स्वतः कृष्णाची भूमिका साकारायची आहे. त्याशिवाय फातिमा सना शेखही मुख्य रोलमध्ये असणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)