अंबाडा

स्त्रीच्या मर्यादेचं एक जग घराच्या उंबरठयाच्या आतच सामावलेलं असताना तिच्या केशसंभाराला साजेसा करकचून बांधला जाणारा अंबाडा हा तिच्या सौंदर्याचा एक महत्त्वाचा हिस्सा बनला होता. अगदी जुन्या काळाचा मागोवा घेतला, तर स्त्रीच्या अंबाडयाला असणारी काळयाभोर रंगाची जाळी आणि तो अंबाडा व्यवस्थित राहण्यासाठी त्याला असणारे काटे (यू पीन) हे त्यात रोवले जायचे. भाळावर चंद्रकोर किंवा कपाळभर कुंकू सामावलं जायचं आणि पारंपरिक साज ल्यायलेल्या त्या स्त्रीचं खानदानी रूप हे त्या चार भिंतीत सामावलेलं असायचं. स्त्रीने माजघराच्याही पुढे यावं म्हटलं तर परवानगी घ्यावी लागायची. घरात केस सोडतानाही दहा वेळा विचार करावा लागायचा.

नऊवारी साडीवर केसांचा बांधला जाणारा अंबाडा, त्यावर फुलांची वेणी तिचं सौंदर्य खुलविणारं. मात्र जुन्या काळी बनविण्यात येणाऱ्या दागिन्यांमध्ये विशेषत: स्त्रियांना माहेराहून अथवा सासरहून केसात माळण्यासाठी देण्यात येणारं सोन्याचं फुलही मायेचं नि अप्रुपाचंच असायचं. भरगच्च अंबाडयातील हे सोन्याचं फूल म्हणजे तिच्या सौंदर्याचा आविष्कारच!
अंबाडयाचा सर्वसाधारण एकच प्रकार, एकच स्टाईल.. जी परंपरागत चालत आली. घर असो किंवा समारंभ अंबाडाच प्रचलित होता. मात्र याला कलाटणी म्हणून मग केसांची वेणी घालण्याची स्टाईलही प्रचलित झाली.

-Ads-

त्यामुळे काहीसा मागे पडलेला अंबाडयाचा लूक मग केसांचा वेण्यांच्या रूपाने सौंदर्याचा स्रेत जपणारा ठरला. परंपरा, रूढींपासून काहीशी स्त्री जरा मोकळी झाली, तिच्या विचारांना जरा वाव मिळाला, उंबरठयाच्या आतच घुसमटणारं तिचं पाऊल उंबरठा ओलांडून त्यावेळच्या शिक्षणाच्या वाटेवर धजावणारं ठरलं. विवाह लवकर झाला तरी तिच्या शिक्षणाची वाट मोकळी झाली, विवाहानंतरही पुढील शिक्षण घेताना नोकरीच्या दिशेनेही तिचा वावर सुरू झाला.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)