अंनिसच्या सभासद नोंदणी महाअभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद

सातारा – 8 जानेवारी रोजी महाराष्ट्र अंनिसच्या सभासद नोंदणी महाअभियानाचा भाग म्हणून सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुका अंनिस शाखेच्यावतीने सकाळी 11 ते 1 या वेळेत रयत शिक्षण संस्थेच्या डी. पी. भोसले कॉलेजवर नोंदणी अभियान राबवण्यात आले. प्रथम कॉलेजचे प्राचार्य सावंत यांच्याशी चर्चा केली. यावेळी हेमंत जाधव व प्रशांत पोतदार यांनी सभासद नोंदणीचे व महाअंनिसचे कार्य याची थोडक्‍यात माहिती देऊन सर्वांचे फॉर्म भरून घेतले.

या कॉलेजचे एनएसएस कॅम्पच्या 120 विद्यार्थ्यांनाही माहिती सांगून सभासद करून घ्या, अशी सूचना प्राचार्यांनी केली. यानंतर दुपारी 2 ते 4 या वेळात कोरेगाव बसस्थानकामध्ये बॅनर लावून पुस्तक स्टॉलसह सभासद नोंदणी घेण्यात आली. यालाही कोरेगावकरांनी चांगला प्रतिसाद दिला. या संपूर्ण मोहिमेत कॉलेजवर 29 व एसटी स्टॅंड वर 13 सभासद झाले. तसेच पुस्तक विक्री देखील करण्यात आली. यासाठी कोरेगावचे शाखाध्यक्ष सी. आर. बर्गे, कार्याध्यक्ष हेमंत जाधव, प्रधान सचिव विक्रम फडतरे, केतन जाधव, भगवान रणदिवे, प्रशांत पोतदार यांनी कृतिशील सहभाग घेऊन सहकार्य केले.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)