अंध विद्यार्थ्यावर मोफत शस्त्रक्रिया

  • डॉक्‍टरांमधील देवमाणूस ः वारं-वार खांद्यातून निखळत होता हात

पिंपरी – नशिबाने अंधत्व आणि गरीबी सोबतच दिली. हे कमी होते की काय म्हणून खांद्याचे दुखणे सुरु झाले. खेळताना दुखापत झाल्यामुळे वारंवार उजवा हात खांद्यातून निखळत असल्याने या अंध तरुणास असह्य वेदना सहन कराव्या लागत होत्या. शस्त्रक्रियेचा खर्च करण्याची क्षमता नसल्याने हा तरुण त्रास आणि वेदना सहन करत होता. धनश्री रुग्णालयाचे संचालक डॉ. अपूर्व यांनी मोफत शस्त्रक्रिया करुन त्याची या वेदनांपासून सुटका करुन दिली.

आर्थिक दृष्ट्‌या हलाक्‍याच्या परिस्थितीत जगत असलेला अंध विद्यार्थी अक्षय पाटील क्रिकेट खेळत असताना उजव्या खांद्यावर पडला. यामुळे त्याचा हात खांद्यातून निखळला होता. डॉ. अपूर्व पटवर्धन यांच्याकडून त्याने हात बसवून घेतला परंतु त्याचा हात खांद्यातून वारंवार निखळत होता. डॉ. अपूर्व पटवर्धन यांनी अक्षयला पुन्हा तपासले. वारंवार हात निखळून खूप त्रास व वेदना होतात. रोजच्या कामावर व हाताच्या हालचालीवर खूप मर्यादा आल्याचे तसेच शिंकताना सुद्धा त्याचा खांद्यातून हात निखळत असल्याचे अक्षयने डॉक्‍टरांना सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अक्षयची बिकट परिस्थिती त्याला होत असलेला त्रास लक्षात आल्यावर स्वतः डॉ पटवर्धनांनी सर्व उपचार पूर्णपणे मोफत करतो असे स्वतःहून सांगितले. अक्षयला धनश्री हॉस्पिटलमधील डॉ राजीव पटवर्धन, डॉ सलोनी कुलकर्णी ह्यांनी मोफत उपचाराचा विश्वास दिला. सुमारे दीड लाख रुपये खर्चाची शस्त्रक्रिया व इतर उपचार पूर्णपणे मोफत करण्यात आले. उपचारासाठी लागणारे इम्प्लांट, स्क्रु व इतर औषधे ह्याचाच खर्च साठ हजार इतका होता. तसेच इतर औषधे शस्त्रक्रिया व रुग्णालयातील वास्तव्याचा सर्व खर्च डॉ. पटवर्धन यांनी स्वतः केला.

अक्षय पाटील हा अंध विद्यार्थी असून त्याचे वडील हयात नाहीत. त्याच्या घरी कमावते असे कोणीच नाही. अक्षयच्या घरी आई व 3 बहिणी आहेत. घरची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. तो शिक्षणासाठी व आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी चिंचवडमधील एका अंध शाळेत आला आहे. रोज करावयाचे काम करण्यासाठी त्याला ऑपरेशन करणे गरजेचे झाले होते. अन्यथा त्याच्या कामावर व उत्पन्नावर परिणाम झाला असता.

अक्षयवर दि. 23 मे पासून उपचाराला सुरुवात झाली आहे. दुसऱ्या दिवशी दि. 24 मे रोजी त्याच्यावर शस्त्रक्रिया सुद्धा करण्यात आली आहे. डॉ अतुल गांधी, डॉ सलोनी, गौतम त्र्यंबके आणि स्वतः डॉ. अपूर्व पटवर्धन ह्यांनी ही शस्त्रक्रिया पूर्ण केली आहे. अक्षय व नातेवाईक व चिंचवडमधील त्याच्या संस्थेने धनश्री हॉस्पिटल, डॉ. पटवर्धन ह्यांचे आभार मानले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)