अंध कलाकारांनी केला दिवाळी पाडवा तेजोमय

पिंपरी – वाघोलीच्या (जि. पुणे) लुई ब्रेल अंध-अपंग कल्याण संस्थेच्या सप्तसूर परिवार सांस्कृतिक मंचाच्या अंध कलाकारांनी चिंचवडकरांचा दिवाळी पाडवा तेजोमय केला. चिंचवड-तानाजीनगर येथील श्री गजानन सत्संग मंडळ यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित केला होता.

गजानन महाराज मंदिरात नेत्रहीन बांधवांनी गायलेल्या ओंकार स्वरूपा, शिर्डीवाले साईबाबा, चढता सूरज धीरे धीरे, दीपावली मनाई सुहानी, मल्हारी खंडेराया, दिन दिन दिवाळी आदी गाण्यांनी श्रोत्यांची मने जिंकली. अर्जुन केंद्रे, ज्ञानेश्वर केंद्रे यांना सिंथेसायझर-किशोर उबाळे, ढोलकी-सोमनाथ गायकवाड, ऍक्‍ट्रोपॅड-राजू खेमनार यांनी संगीत साथ दिली. गायक राहुल मोरे, महेश घोरपडे आदींची गाणी उल्लेखनीय झाली. कविता व्यवहारे या नेत्रहीन युवतीने कार्यक्रमाचे निवेदन केले.

श्री गजानन सत्संग मंडळाच्या वतीने लुई ब्रेल अंध-अपंग कल्याण संस्थेच्या 115 व्यक्तींना सुकामेवा आणि फराळ वाटप तसेच एकावन्न हजार रुपयांचा धनादेश आर्थिक मदत म्हणून देण्यात आला. विश्वनाथ धनवे, किशोर कदम, प्रताप भगत, दत्तात्रेय सावकार या वेळी उपस्थित होते.

याच क्षणाचे औचित्य साधून याच ठिकाणी निगडी प्राधिकरण येथील कै. तुकाराम तनपुरे फाऊंडेशन संचालित पोलीस नागरिक मित्र संघटना यांच्या वतीने लुई ब्रेल अंध अपंग कल्याण संस्थेच्या 115 मुलांना 25 किलो दिवाळी फराळ वाटप करण्यात आले. संस्थेचे अनिल पालकर, प्रकाश मिर्झापूरे, सूर्यकांत वरसावडे, लक्ष्मण शिंदे, दत्तात्रेय अवसरकर, विठ्ठल सहाणे, अरुण पाटील, राजाराम थिटे, चंद्रकांत पवार, मंगेश कवी, अशोक तनपुरे, शीला कार्लेकर आदींनी या उपक्रमात सहभाग घेतला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
2 :thumbsup:
1 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)