अंधेरी ते गोरेगाव हार्बर विस्तारीत लाईनचे उद्घाटन

मुंबई : अंधेरी ते गोरेगाव या विस्तारीत हार्बर रेल्वे लाईनचा केंद्रीय रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी उपनगरीय रेल्वेसाठी विविध ४९ सुविधांचाही रेल्वेमंत्री यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.

गोयल म्हणाले की, केंद्र शासनाने मुंबईतील रेल्वे सुविधांचा विकास करण्यासाठी ५४ हजार ७७७ कोटी रूपयांचे विविध प्रकल्प हाती घेतले आहे. हार्बर लाईनचा विस्तार बोरिवलीपर्यंत करण्यात येणार आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मीनल ते पनवेल एलिवेटेट कॉरिडॉर, पनवेल ते विरार रेल्वेसेवा, अत्याधुनिक सिग्नल सिस्टीम, वातानुकूलीत लोकल सेवा असे विविध प्रकल्प नजीकच्या काळात सुरू केले जाणार आहे. देशातील पायाभूत सुविधा निर्मीतीच्या एकूण कामांपैकी ५० टक्के कामे हे एकट्या महाराष्ट्रात सुरू आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)