मुंबई: अंधेरी पूर्वमधील मधू इंडस्ट्रियल इस्टेटला आज भिषण आग लागली. ही आग सकाळी दहा वाजेच्या सुमारास लागली. या दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 15 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. दरम्यान, आगीत सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवीतहानी झाली नाही.
मधू इंडस्ट्रियल इस्टेट ही कंपनी अंधेरी पूर्वेकडील नगरदास मार्गावर आहे. सकाळी दहाच्या सुमारास इथे आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे दोन लहान फायर इंजिन रवाना झाले. 7 मजली असलेल्या या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर आग लागली.
इमारतीतील इलेक्‍ट्रिक वायरिंग, फर्निचर यासारख्या उपकरणांमुळे आग अल्पावधित भडकली. ही आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. दरम्यान, मुंबईत गेल्या काही दिवसांपासून आग लागण्याच्या घटना वारंवार घडत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)