‘अंधाधुन’ चित्रपट करतोय चांगली कमाई…

मागील शुक्रवारी बॉलीवूडमध्ये दोन मोठे ‘अंधाधुन’ आणि ‘लावयात्री’ चित्रपट प्रदर्शित झाले. आयुष्मान खुराना अभिनेता असलेला ‘अंधाधुन’ चित्रपट याने प्रदर्शनाच्या दिवशी २. ३५ कोटी रुपयांची कमाई केली होती. त्यानंतर या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी दुप्पट कमाई केली.  तर सलमान खानाचा मेहुणा आयुष् शर्मा याचा चित्रपट ‘लवयात्री’ याने २. १० कोटी  रुपये कमविले.

अंधाधुन चित्रपटाने समीक्षकांची वाहवाही मिळवली होती. त्यामळे त्याचे रिव्हिव चांगले आले आणि त्याचा त्याच्या व्यवसाय वाढण्यास उपयोग झाला. समीक्षकांकडून पसंती मिळाल्यामुळे या दोन चित्रपटांपैकी एकाची निवड करणे प्रेक्षकांना सोपे गेले.

-Ads-

अंधाधुन चित्रपट हा अनपेक्षित वळणे घेऊन खेळवून ठेवणारा चित्रपट आहे. यात आयुष्यमान खुराणाचे पात्र अनेकवेळा विचार करण्यास भाग पडते तर तब्बू, राधिका आपटे याची पत्रे देखील दमदार आहेत. त्यामुळे हा चित्रपट उत्सुकता टिकवून ठेवतो. पुढे काय होणार याकडे याची उत्सुकता टीकून राहते.

हा चित्रपट श्रीराम राघवन यांनी दिग्दर्शित केला असून त्यांनी दिग्दर्शित केलेले मागील काही चित्रपट देखील मोठे यशस्वी ठरले होते. त्यात एक हसीना थी  जॉनी गद्दार, एजेंट विनोद आणि बदलापूर यांचा समावेशआहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)