कामशेतमध्ये ·अंधांचे “पॅराग्लायडिंग’

  • तीन अंधांची दिव्यांगत्वावर मात; पाच तास हवेत संचार

तळेगाव एमआयडीसी – जागतिक दिव्यांग दिनानिमित्त कामशेत येथे तीन अंधांसह पाच जणांनी पराग्लायडिंग करीत हवेत झेप घेतली.

कामशेतच्या परिसरात कोल्हापूर येथील प्रेरणा असोसिएशन फॉर द ब्लाइंड व निर्वाणा ऍडव्हेंचेर पुणे यांच्या वतीने या साहसी उपक्रमाचे आयोजन केले होते. प्रेरणाचे प्रमुख प्रा. सतीश नवले हे मूळचे पुण्याचे आहेत. अंध असून, देखील त्यांनी एम.ए, एम.एड. पर्यंतचे शिक्षण पुणे विद्यापीठात पूर्ण केले आहे.

सध्या कोल्हापूर येथे ते प्रेरणा संस्थेच्या माध्यमातून अंधांसाठी काम करत आहेत. त्यांनी 10 वर्षांपूर्वी हवेत झेपावण्याची संकल्पना मांडली होती. त्यांची ही इच्छा निर्वाणा ऍडव्हेंचेर पुणे यांच्या माध्यमातून 3 डिसेंबर 2018 जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून पूर्ण झाली. सध्या कोल्हापूर येथे असणारे प्रा. सतीश नवले पुण्याचे मिलिंद कांबळे आणि पूनम खुळे या तीन अंधांनी पॅराग्लायडिंग’च्या साहाय्याने सुमारे 1000 फूट उंचीवर पाच तास उडण्याचा आनंद घेत जागतिक अपंग दिन साजरा केला. त्यांच्या सोबत सुनील रांजणे आणि शिवाजी करडे या “डोळस’ व्यक्‍ती होत्या. या साहसी उपक्रमासाठी निर्वाणचे रवी शेलार, विनोद आणि बाळू या पायलटणी सहाय्य केले.

सकाळी आठ वाजता त्यांनी पॅराग्लायडिंगच्या सहाय्याने अवकाशात झेप घेतली. दुपारी दीड वाजेपर्यंत सर्वांनी या साहसाचा आनंद घेतला. लेफ्ट आणि राईट कंट्रोल कसे करायचे, “वॉकी टॉकी’चा वापर, तसेच वातावरणातील बदल कसे झेलायचे याचे पूर्व प्रशिक्षण नसतानाही या दिव्यांगानी 100 हुन अधिक प्रत्यक्षदर्शीच्या उपस्थित हा थरार अनुभवला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)