अंदुरेकडून जप्त केलेले पिस्तूल अमोल काळेनेच पुरविले

अमोल काळेला 14 सप्टेंबरपर्यंत कोठडी

पुणे- अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात सचिन अंदुरे याच्याकडून जप्त करण्यात आलेले पिस्तूल अमोल काळे यानेच पुरवले असल्याची माहिती बचाव पक्षाने केलेल्या युक्‍तीवादानंतर न्यायालयात स्पष्ट झाली. दरम्यान, काळे याला दि. 14 सप्टेंबरपर्यंत सीबीआय कोठडीत ठेवण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एम. एस. ए. सय्यद यांनी दिला आहे.
या प्रकरणात वीरेंद्र तावडे आणि सचिन अंदुरे हे दोघे न्यायालयीन कोठडीत आहेत. तर, राजेश बंगेरा, शरद कळसकर आणि अमित दिगवेकर हे तिघे पोलीस कोठडीत आहेत. गौरी लंकेश हत्याप्रकरणात आरोपी असलेल्या अमोल काळे याला या प्रकरणात अटक करून सीबीआयने दुपारी 1 च्या सुमारास न्यायालयात हजर केले. त्यावेळी त्याला घातलेला काळा बुरखा काढण्यास न्यायालयाने सांगितले. त्यावेळी सीबीआय विरोधात काही तक्रार आहे का, अशी विचारणा न्यायालयाने केली. त्यास “नाही’ असे उत्तर त्याने दिले. त्यानंतर सीबीआयचे सरकारी वकील विजयकुमार ढाकणे म्हणाले, या प्रकरणाचा तपास उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. डॉ. हत्येच्या अनुषंगाने केलेल्या तपासातील बाबी माध्यमांमध्ये तसेच वृत्तपत्रांमध्ये येत आहेत. त्यामुळे न्यायालयात युक्‍तीवाद करू नये असा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे. तसेच तपासाची माहिती देणारा रिमांड अहवाल न्यायाधीशासमोर सादर करावा, असे देखील उच्च न्यायालयाने म्हटले असल्याची माहिती ढाकणे यांनी दिली.
दरम्यान, या रिमांड अहवालाची कॉपी बचाव पक्षाच्या वकीलांनाही देण्यात आली आहे, त्यांनीही ती कॉपी माध्यमांना देऊ नये, अशी विनंती करीत काळे याला 14 दिवस पोलीस कोठडी देण्याची मागणी त्यांनी केली. त्यास बचाव पक्षाचे वकील धर्मदार चंडेल म्हणाले, उच्च न्यायालयाच्या आदेशाची कॉपी आमच्याकडे नाही. न्यायालयात कोणत्याही प्रकारचा युक्‍तीवाद होणार नाही. त्यामुळे आम्हाला समजणार नाही. त्यामुळे आम्हाला केस डायरी पाहण्यास मिळावी, असे सांगताना, अमोल काळे याने शस्त्रास्त्र आणि दुचाकी पुरविण्याचे काम केल्याचा सीबीआयने दावा केला आहे. ते केवळ रिमांड अहवालामध्ये असून चालणार नाही. तो उल्लेख केस डायरीमध्ये आहे की, नाही हे तपासले पाहिजे. सीबीआयला कशासाठी पोलीस कोठडी आणि का हवी आहे. याबाबत सीबीआयने न्यायालयाला पटवून सांगितले पाहिजे, असा युक्‍तीवाद केला. दरम्यान, सचिन अंदुरे याच्या पोलीस कोठडी सीबीआयने काय तपास केला याचाही विचार व्हावा. सीबीआयच्या ताब्यात अंदुरे असताना त्याच्याकडे स्पेशल इन्व्हीस्टीगेटिंग टिमने (एसआयटी) कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्त्येच्या अनुषंगाने तपास केला. त्यामुळे सीबीआयच्या ताब्यात जेव्हा आरोपी असतो. तेव्हा दुसऱ्या गुन्ह्यातील तपास यंत्रणा येऊन कशी काय चौकशी करते, असा सवालही ऍड. धर्मराज यांनी यावेळी उपस्थित केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)