अंदाजपत्रक छपाईवर 18 लाखांचा खर्च

पिंपरी – महापालिकेचे सन 2018-19 चे सुधारीत आणि सन 2019-20चे मूळ अंदाजपत्रक पुस्तके छपाई करून घेण्यात येणार आहेत. त्यासाठी सुमारे 17 लाख 64 हजार रुपये खर्च येणार आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेची सन 2018-19चे सुधारीत आणि सन 2019-20चे मूळ अंदाजपत्रक पुस्तके छपाई करून घेण्यात येणार आहेत. त्यासाठी महापालिका मध्यवर्ती भांडार विभागातर्फे ई-निविदा मागविण्यात आली होती. त्याद्वारे अंदाजपत्रक पुस्तके 1 ते 4 छपाईसाठी महापालिकेने 18 लाख 52 हजार 710 रुपये अंदाजपत्रकीय दर सादर केला होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नुसार प्राप्त निविदांपैकी आकुर्डीच्या मेसर्स विजय प्रिंटर या ठेकेदार कंपनीने महापालिकेच्या दरापेक्षा 4.74 टक्के कमी दराची निविदा सादर केली. त्यांनी महापालिका अंदाजपत्रक पुस्तके 1 ते 4 बाबी छपाईचे काम 17 लाख 64 हजार 746 रुपयांमध्ये करून देण्याचे मान्य केले आहे. त्यामुळे त्यांनी सादर केलेला लघुत्तम दर पाहता आकुर्डीच्या मेसर्स विजय प्रिंटर या ठेकेदार कंपनीकडूनच महापालिका अंदाजपत्रक पुस्तके छपाई करून घेण्यात येणार आहेत. महापालिका स्थायी समिती सभेत त्यावर शिक्कामोर्तब होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)