अंत्यविधीचा पास मिळणार ऑनलाइन

मोबाइल अॅपवरूनही करता येणार बुकिंग

पुणे – महापालिकेकडून अंत्यविधीसाठी उपलब्ध करून दिला जाणारा पास आता ऑनलाइनही उपलब्ध करून दिला जाणार आहे. त्यासाठीची प्रणाली (सॉफ्टवेअर) तयार करण्यात येत असून पालिकेच्या “पीएमसी कनेक्‍ट’ या मोबाइल अॅपवरही ही सुविधा लवकरच पुणेकरांसाठी उपलब्ध होणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी पालिकेच्या आरोग्य विभागाकडून पास घेणे बंधनकारक आहे. त्यासाठी शहरात 2 ठिकाणी 24 तास पासकेंद्र सुरू असतात. मृत व्यक्तीच्या अंत्यविधीची तयारी सुरू असताना त्याच्या कुटुंबीयांना तेथे जाऊन पास आणावा लागतो. त्यावर कोणत्या स्मशानभूमीमध्ये दहन करण्यात येणार याची नोंद करण्यात येते. मात्र, यामध्ये बराच वेळ जातो. तसेच यासाठी उशीर झाल्यास नातेवाईकांमध्ये असंतोष निर्माण होतो. ही बाब लक्षात घेऊन आता मृत्यूवार्ता ऑनलाइन देण्याची सुविधा निर्माण करण्यात येत आहे. व्यक्तीच्या मृत्यूनंतर पालिकेच्या या ऑनलाइन प्रणालीत संबंधित डॉक्‍टरने दिलेला मृत्यू दाखला अथवा नगरसेवकाचे पत्र “अपलोड’ करावे लागणार आहे. त्यामधील माहिती अचूक भरल्यानंतर काही वेळातच हा पास संबंधिताला उपलब्ध होणार आहे. त्याचा मेसेज मोबाइलवर देण्यात येणार आहे. तसेच ज्या स्मशानभूमीमध्ये दहन होईल तेथील कर्मचारी संबंधित पासचा क्रमांक टाकून विधी पूर्ण झाल्याची माहिती ऑनलाइन पद्धतीनेच पालिकेला देतील. पालिकेचे संबंधित विभागाचे डॉक्‍टर ही माहिती पडताळून एका दिवसात मृत्यू दाखला देखील नातेवाईकांना देण्यासाठीची यंत्रणा उभारली जाणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)