अंतीम संघात केदार जाधवचा समावेश होणार?

विंडीजविरुद्धच्या अखेरच्या तीन एकदिवसीय सामन्यांसाठी बुधवारी संघ जाहीर करण्यात आला होता. त्यात केदार जाधवला स्थान दिले गेले नव्हते. त्यामुळे निवडसमितीवर केदारने नाराजी व्यक्त केली होती. मात्र, निवड समितीने वेस्ट इंडिज विरुध्दच्या चौथ्या आणि पाचव्या एकदिवसीय सामन्यासाठी त्याची संघात निवड करुन त्याला दिलासा दिला आहे. निवड समितीने वेस्ट इंडिजविरुद्धची टी-20 मालिका आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील टी -20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली. यासोबतच केदार जाधवचा वेस्ट इंडिजविरुद्धच्या अखेरच्या दोन सामन्यांमघ्ये संघात समावेश केल्याचे निवड समितीने जाहीर केले आहे.

केदारने संघातून वगळण्याबाबत प्रतिक्रिया देताना “निवडसमितीने कोणतीही पूर्वकल्पना दिली नव्हती. मीडियाकडूनच हे वृत्त समजले. असे करण्यामागचे निवड समितीचे काय उद्दिष्ट आहे हे मला माहिती नाही. मलाही ते जाणून घ्यायचे आहे.’ असा नाराजीचा सुर लावला होता. त्यावेळी निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी त्याचे दुखापतीचे कारण सांगितले होते. मात्र, त्यानंतर आगामी दोन सामन्यांसाठी त्याचा संघात समावेश केला असून पुणे येथिल सामन्यात भारतीय संघ पराभूत झाल्या मुळे आज मुंबई येथे होणाऱ्या सामन्यात त्याचा अंतिम आकरा खेळाडूंमध्ये सहभाग केला जाण्याची शक्‍यता आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)