‘अंतराळ संशोधनात भारत महत्वपूर्ण भूमिकेत असेल’

पुणे – काही वर्षांपूर्वी जेव्हा जगातील इतर देश 8-10 मीटरची दुर्बिण वापरत होते, त्यावेळी आपण 2.5 मीटरच्या दुर्बिण वापरत होतो. तंत्रज्ञानासाठी आपल्याला इतरांवर अवलंबून राहवे लागत होते. मात्र, आज हे चित्र बहुतांशी बदलले आहे. अंतराळ संशोधनासंदर्भातील तंत्रज्ञानाबाबत भारताने बरीच प्रगती केली आहे. आज अनेक वेगवेगळे तंत्रज्ञान भारतात उपलब्ध आहे. तसेच पुढील 10 वर्षात भारत हा अंतराळ संशोधन क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण भूमिकेत असेल, असा विश्‍वास “आयुका’चे संचालक डॉ. शोमक रायचौधरी यांनी व्यक्त केला.

ज्योतीर्विद्या परिसंस्थेच्या 75 व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी “भारतातील खगोलशास्त्रातील मोठे प्रकल्प’ याविषयावर डॉ. रायचौधरी यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी संस्थेचे माजी अध्यक्ष सुहास गुर्जर, मुजतबा लोखंडवाला हे उपस्थित होते.

डॉ. रायचौधरी म्हणाले, अंतराळ तंत्रज्ञान क्षेत्रात भारताने मोठा पल्ला गाठला आहे. ही घोडदौड यापुढेही चालू राहणार आहे. यामध्ये “मल्टी डायमेशनल टेलिस्कोप’, “लायगो डिटेक्‍शन सेंटर’ अशा विविध महत्त्वपूर्ण प्रकल्पांचा समावेश आहे. मात्र, हे प्रकल्प केवळ भौतिकशास्त्राच्या सहाय्याने पूर्ण होणार नाहीत. तर, यासाठी अभियांत्रिकीच्या विविध शाखांमधील तज्ज्ञांची गरज पडणार आहे. त्यामुळे आगामी काळात देशाला उत्क़ृष्ट अभियंत्याची मोठी फौज उपयोगी पडणार आहे. अभियांत्रिक क्षेत्रातील नवोदितांनी आणि विद्यार्थ्यांनी ही बाब लक्षात घेऊन त्या दिशेने प्रयत्न करावेत. अंतराळ संशोधन, भौतिकशास्त्र या क्षेत्रांमधील हौशी शास्त्रज्ञ आणि तज्ज्ञ शास्त्रज्ञ यांच्यामधील फरक वेगाने कमी होत आहे. विविध क्षेत्रातील नागरिक या क्षेत्रात मोलाचे योगदान देत आहे. तसेच भारतीय नागरिकांना आता परकीय तंत्रज्ञानावरील अवलंबित्व हळूहळू कमी होत आहे, ही एक अभिमानाची बाब असल्याचेही त्यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)