अंतराच्या मारेकऱ्याची माहिती देणाऱ्यास 25 हजाराचे बक्षीस

पिंपरी – संगणक अभियंता अंतरा दास खून प्रकरणातील मुख्य आरोपी मात्र अजून पोलिसांना सापडलेला नाही. या आरोपीची माहिती देणाऱ्या व्यक्तिला पोलिसांकडून 25 हजार रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे.

एकतर्फी प्रेमातून अंतरा दासचा डिसेंबर 2016 मध्ये तळवडे येथे धारदार शस्त्राने खून करण्यात आली. अंतरा दास ही कामावरून घरी परतत असताना तळवडे येथे मारेकऱ्याने तिचा पाठलाग करून, पाठीमागून तिच्यावर तीक्ष्ण हत्याराने वार केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्याअंतराचा मृत्यू झाला. तिच्याच कंपनीत काम करणाऱ्या संतोष कुमार याने मारेकऱ्याला पैसे देवून, एकतर्फी प्रेमातून हा खून केल्याचे पोलीस तपासात उघड झाले.

याप्रकरणी आरोपी संतोष कुमारला देहूरोड पोलिसांनी बंगळुरुतून अटक केली होती. मात्र संतोष कुमार याने ज्या व्यक्तिला अंतराचा खून करायला पैसे दिले होते तो मारेकरी सापडावा म्हणून पोलिसांनी नागरिकांना जाहीर आवाहन केले आहे. या प्रकरणातील निळ्या गोल गळ्याचा निळ्या टी शर्टवर पट्टे व पॅन्ट घातलेल्या मारेकऱ्याबद्दल कोणालाही खात्रीशीर व उपयुक्त काही माहिती असेल तर त्यांनी पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या 9423884745, 9420827001, 9923481235, 9823232421 या क्रमांकावर संपर्क साधावा. ही माहिती देणाऱ्या व्यक्तिचे नाव इतर व माहिती गुप्त राखण्यात येईल. तसेच माहिती देणाऱ्यास रोख 25 हजाराचे बक्षीस पोलीस प्रशासनातर्फे देण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)