“अंतरंग’व्दारे विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण

पिंपरी – डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटीकल सायन्सेस ऍण्ड रिसर्च महाविद्यालयाचा अंतरंग हा बक्षीस वितरण समारंभ नुकताच संपन्न झाला.

पुणे विभागाचे सहसंचालक डॉ. डी. आर. नंदनवार, जेनेव्हा बायोफार्मास्युटिकल्सचे उपमहाव्यवस्थापक डॉ. राजेश कुमार सिंग हे उपस्थित होते. डॉ. नंदनवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात राज्यस्तरीय संशोधन स्पर्धा अविष्कार मधील विजेते शिक्षक, प्रा. स्नेहा चंदणी, प्रा.जयश्री महोरे तसेच आंतरमहाविद्यालन संशोधन स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान करण्यात आला.

-Ads-

मागील शैक्षणिक वर्षात प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास 10 हजारांचा धनादेश देण्यात आला. सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस प्रदान करण्यात आली. महाविद्यालयाचे वार्षिक नियतकालीक अंतरंग-2018 चे प्रकाशन करण्यात आले. प्राचार्य सोहन एस. चितलांगे यांनी महाविद्यालयाचा वार्षिक अहवाल सादर केला. डॉ. आशा थॉमस व प्रा.स्नेहा चंदानी यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. रवींद्र बडे यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)