अंडर-19 विश्‍वचषक, पाकचे सहा गडी बाद, भारताच्या गिलचे शतक

क्राईस्टचर्च – न्यूझीलंडमधल्या अंडर-19 विश्वचषकात भारताच्या शुभमन गिलने नाबाद शतक झळकवले आहे. पाकिस्तानविरुद्धच्या उपांत्य सामन्यात शुभमनने ही कामगिरी केल्याने तो पुन्हा एकदा हीरो ठरला आहे. गिलच्या या शतकाच्या जोरावर भारताने नऊ बाद 272 धावांची मजल मरली. पाकिस्तानसमोर विजयासाठी 273 धावांचे आव्हान आहे.

इशान पोरेलचा भेदक माऱ्यावर पाकिस्तानचा तिसरा गडी बाद झाला आहे. कर्णधार पृथ्वी शॉने हा अप्रतिम झेल टिपला आहे. यापूर्वी पाकला दुसरा धक्का, इम्रान शाह अवघ्या 2 धावांवर तर पहिला धक्का, झैद आलम 7 धावांवर बाद झाल्याने बसला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)