अंडर-19 विश्वचषक, भारताने पाकचा उडविला धुव्वा, 203 धावांनी विजय

क्राईस्टचर्च – न्यूझीलंडमधल्या अंडर-19 विश्वचषकात दुसऱ्या उपांत्य सामन्यात भारताने पाकिस्तानला हरवले आहे. या सामन्यात भारताने पाकिस्तानसमोर 273 धावांचे आव्हान ठेवले होते. भारताकडून शुभमन गिलने नाबाद 102 धावांची खेळी केली. शुभमने शेवटच्या चेंडूवर आपले शतक पूर्ण केले. यंदाच्या अंडर 19 विश्वचषकातील भारताकडून हे पहिलेच शतक आहे. भारताने 50 षटकांत 9 गडी बाद 272 धावा केल्या. पाकिस्तानच्या फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली. त्यांचे 9 फलंदाज अवघ्या 69 धावांतच परतले. भारताचा वेगवान गोलंदाज ईशान पोरेलच्या गोलंदाजीवर पाक फलंदाजांची भंबेरी उडाली.

भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. भारताच्या सलामीवीरांनी प्रथम फलंदाजी करताना चांगली सुरूवात केली. कर्णधार पृथ्वी शॉने 42 धावांची खेळी केली. तर मनज्योत कालरा 47 धावा काढून बाद झाला. या संपूर्ण मालिकेत भारताने एकही सामना गमावलेला नाही. उपांत्य फेरीतील हा सामना जिंकल्यास अंतिम सामन्यात भारताची धडक ऑस्ट्रलियाबरोबर होणार आहे.

-Ads-

भारताकडून शुभमनने 94 चेंडूवर सर्वाधिक 102 धावा बनवल्या. त्याने या विश्वचषकातील सर्व सामन्यात 50 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. अंडर 19 स्तरावर आतापर्यंत भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या सामन्यात भारताने 12 तर पाकने 8 सामन्ये जिंकले आहे. भारताने यंदाच्या विश्वचषकात पापुआ न्यू गिनी, झिम्बाब्वे आणि बांगलादेशचा पराभव केला आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)