अंडर १९ विश्वचषक- शुभमन गिलचे विक्रमी शतक

ख्राईस्टचर्च – उपान्त्य सामन्यात पाकिस्तान विरुद्ध शुभमन गिलने 94 चेंडूत नाबाद 102 धावा करत अनेक विक्रम स्थापित केले. 19 वर्षांखालील विश्‍वचषक स्पर्धेतील भारत-पाकिस्तान सामन्यातील हे पहिले शतक ठरले आहे. शुभमन गिलने शतक ठोकत पाकिस्तानच्या सलमान बट्टला मागे टाकले. सलमान बट्टने 2002 मध्ये भारताविरुद्ध नाबाद 85 धावांची खेळी केली होती.

या विश्‍वचषकात शुभमनने पाच सामन्यात 170.50 च्या सरासरीने 341 धावा केल्या आहेत. आतापर्यंत त्याने एका शतकासह 3 अर्धशतके केली आहेत. दरम्यान, सर्वात वेगवान शतक ठोकणाऱ्या तो तिसरा भारतीय फलंदाज ठरला. यापूर्वी विराट कोहलीने 2008 साली वेस्ट इंडिजविरुद्ध 73 चेंडूत, ऋषभ पंतने निमिबियाविरुद्ध 82 चेंडूत शतक ठोकले होते.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)