अंडर १९ विश्वचषक- भारतीय संघावर शुभेच्छांचा वर्षाव

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्या मध्ये झालेल्या अंडर १९ विश्वचषक स्पर्धेमधील उपांत्य फेरीतील सामन्यामध्ये भारताने आपल्या प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघाचा २०३ धावांनी दणदणीत पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. तत्पूर्वी भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारताने ५० षटकांमध्ये ९ गडी गमावत २७२ धावा केल्या. भारताकडून शुभम गिल याने १०२ धावांची खेळी केली यामध्ये ७ चौकारांचा समावेश होता.

२७३ धावांचे लक्ष्य घेऊन उतरलेला पाकिस्तानचा संघ मात्र भारताच्या भेदक माऱ्यासमोर फार काळ तग धरू शकला नाही. पाकिस्तानचा संपूर्ण संघ अवघ्या २९.३ षटकांमध्ये धावांमध्ये तंबूत परतला. भारताकडून ईशान पोरेल याने सर्वाधिक ४ बळी घेतले. भारताच्या या दणदणीत विजयाचा जल्लोष ट्विटर वर सुरु झाला असून क्रीडा, पत्रकारिता व सिनेजगतातील दिग्गजांनी भारतीय अंडर १९ संघाचे ट्वीट करत अभिनंदन केले आहे.

-Ads-

भारतीय संघाचा माजी सलामीवीर व स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग याने ट्वीट द्वारे टीम इंडियाचे अभिनंदन करत अंतिम सामन्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

 मोहम्मद कैफ याने देखील ट्वीटर द्वारे खेळाडूंचे अभिनंदन केले आहे. कैफ ने भारत फायनल गाठण्याची ही सहावी वेळ असल्याचे त्याने अधोरेखित केले आहे.

 

 अंडर-19 विश्वचषक, भारताने पाकचा उडविला धुव्वा, 203 धावांनी विजय

 

What is your reaction?
19 :thumbsup:
1 :heart:
0 :joy:
1 :heart_eyes:
1 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)