अंडर १९ विश्वचषक- बीसीसीआयकडून रोख बक्षिस

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डने (बीसीसीआय) 19 वर्षांखालील विश्‍वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करणाऱ्या भारतीय संघाला रोख पुरस्कार देणार असल्याची घोषणा अध्यक्ष सी. के. खन्ना यांनी मंगळवारी केली आहे. खन्ना म्हणाले, मी भारतीय संघातील खेळाडू आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांचे विशेष अभिनंदन करतो. विश्‍वचषक स्पर्धेसाठी राहुल द्रविडने दिलेले योगदान प्रशंसनीय आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच भारतात प्रतिभाशाली क्रिकेटपटू जगासमोर येत आहेत. बीसीसीआयकडून भारतीय संघातील खेळाडूंना रोख बक्षिस देऊन गौरव करणार आहे, असे त्यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)