अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला भाजपात घेणार

गोंडा (उत्तर प्रदेश) – अंडरवर्ड डॉन दाऊद इब्राहिम यालाही भाजपा आपल्या पक्षात सामावून घेऊ शकेल असे वादग्रस्त विधान उत्तर प्रदेशातील भाजपाच्या एका मंत्र्याने केले आहे. उत्तर प्रदेशच्या योगी सरकारमधील एक मंत्री उपेंद्र तिवारी यांनी भाजपा दाऊद इब्राहिम याला पक्ष सदस्य बनवून घेऊ शकेल असे म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्याने मोठाच गदारोळ उडाला आहे. दाऊद इब्राहिम हे नाव घेताच सर्वप्रथम आठवण येते, ते मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याची.

भारतासह अनेक देश ज्याला अटक करण्याचा प्रयत्न करत आहेत अशा खतरनाक अंडरवर्ल्ड डॉनला भाजपाच्या एका ज्येष्ठ नेत्याने पक्षात प्रवेश देण्याचे वक्तव्य करावे ही मोठी आश्‍चर्याची गोष्टृ आहे.

योगी आदित्यनाथ सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्याच्यी निमित्ताने आयोजित एका कार्यक्रमात उपेंद्र तिवारी बोलत होते.
मीडियाच्या प्रश्‍नांना उपेंद्र उत्तरे देताना ते म्हणाले की, सबका साथ सबका विकास यावर भारतीय जनता पक्षाचा विश्‍वास आहे. आणि यातूनच त्यांनी सांगितले की, जर इच्छा असेल तर जर भविष्य काळात मुलायम सिंग यादव, मायावती, अखिलेश यादव यांनी जरी भाजपात येण्याची इच्छा व्यक्त केली, तर त्यांचे स्वागत आहे; त्यांनाही भाजपामध्ये प्रवेश घेता येईल.

अटक कण्यात आल्यानंतर जर दाऊद इब्राहिमने आपली चूक मान्य परून पश्‍चात्ताप व्यक्‍त केला, तर तो ही भाजपाचा सदस्य बनू शकेल. पाहिजे तर तोही मोबाईल द्वारा भाजपाचा सदस्य बनू शकेल असे तिवारी यांनी म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)