5 जणांना 10 वर्षे कारावास
मुंबई – अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा हस्तक फरीद तनाशा याच्या हत्येप्रकरणी मोक्का विशेष न्यायालयाने सात वर्षानंतर 11 जणांना दोषी ठरविले. याप्रकरणी न्यायालयाने सहा जणांना जन्मठेप, तर पाच जणांना 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली.

अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनच्या हस्तक फरीद तनाशा याची चेंबूरमधील एका रिअल इस्टेटच्या वादातून 2 जून 2010 रोजी चेंबूरमधील टिळक नगर परिसरात त्याच्या घरातच दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी 11 जणांना अटक करून त्यांच्या विरोधात मोक्का कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला होता. न्यायाधीश एस. एम. भोसले यांच्यासमोर आज सुनावणी झाली. यावेळी सरकारी वकीलांनी ही हत्या रिअल इस्टेटच्या वादातून हत्या झाली, असा दावा केला.

चेंबूरमधील बिल्डर दत्तात्रय भाकरे यांनी विकास करण्यासाठी घेतलेल्या भुखंडला स्थानिक रहिवाशांनी विरोध केला. काही सभासदांनी फरीद तनाशा याची मदत घेतल्याने दत्तात्रय भाकरे यांनी भरत नेपाळी या गॅंगस्टरला 90 लाखाची सुपारी देऊन फरीदची हत्या केल्याचा दावा केला होता. तसे पुरावे न्यायालयात सादर केले. याची दखल घेऊन न्यायालयाने सहा जणांना जन्मठेप आणि पाच जणांना 10 वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली.

र्

जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आलेले आरोपी
जफर खान, मोहम्मद साकिब खान, रविप्रकाश सिंग, पंकज सिंग, रणधीर सिंग आणि मोहम्मद रफिक शेख.

10 वर्षाची कारवासाची शिक्षा ठोठावलेले आरोपी
रवींद्र वारेकर, विश्‍वनाथ शेट्टी, दत्तात्रय भाकरे, राजेंद्र चव्हाण आणि दिनेश भंडारी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)