अंजु मावशी म्हणजे साक्षात अन्नपूर्णा… 

अंजली जोशी आम्हा सगळ्यांची लाडकी अंजु मावशी, गोड  स्वभावाची. सतत हसतमुख असणारी, साक्षात अन्नपूर्णा. सेटवर सुंदर जेवण म्हणजे अंजू मावशीचं जेवण. अत्यंत चविष्ट, मनापासून केलेला स्वयंपाक ती तितक्याच प्रेमाने खाऊ घालते. तिच्या घरी अगदी रात्री १२ वाजता गेलं तरी गरमागरम करून वाढणारी. मला तिने केलेला शिरा प्रचंड आवडतो.

-Ads-

आज ६ ऑगस्ट २०१८ तिच्या आयुष्यातला महत्वाचा दिवस. कारण तिने सुरु केलेल्या अंजली फूड्स या हॉटेलला १ वर्ष पूर्ण झालं. दहिसर पूर्व, मुंबई इथं ते हॉटेल आहे. वर्षभरातच हे हॉटेल लोकप्रिय झालं ते इथल्या चवीमुळे. स्टाफला अत्यंत प्रेमाने सांभाळून घेऊन ग्राहकांशी संवाद साधणं हे सगळं तिला सहज जमतं. तिच्या कुटुंबाचा संपूर्ण पाठिंबा तिला आहे. या उदयोगिनीला खूप खूप शुभेच्छा !!! या हॉटेलच्या अनेक शाखा व्हाव्यात हे तुझं स्वप्न लवकर पूर्ण होवो.

– प्राजक्ता हनमघर 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
33 :thumbsup: Thumbs up
25 :heart: Love
0 :joy: Joy
4 :heart_eyes: Awesome
3 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)