अंजुमन इत्तेहाद तंबोलीयन जमातेच्या वतीने राज्यस्तरीय वधु-वर परिचय मेळावा

नीरा नरसिंहपूर- अंजुमन इत्तेहाद तंबोलीयन जमात महाराष्ट्र राज्य (पुणे शहर) यांच्या वतीने राज्यस्तरीय वधु-वर परीचय मेळावा रविवारी (दि. 21) आयोजित करण्यात आल्याची माहिती राज्याध्यक्ष व संयोजक हाजी उस्मानशेठ हाजी हाशमुद्दीन तंबोली (करमाळकर) यांनी दिली.
हा मेळावा “मरहुम (कै.) हाजी हाशमुद्दीन एम. तंबोली एज्युकेशन सोशल ऍण्ड चॅरिटेबल ट्रस्ट’च्या वतीने आयोजित करण्यात आला आहे. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक, लोहिया नगर, पोलीस चौकी शेजारी, टिंबर मार्केट, गंज पेठ, पुणे या ठिकाणी मेळावा होणार असल्याची माहिती सहसंयोजक हाजी अल्ताफशेठ तंबोली (करमाळकर) यांनी दिली. मेळाव्यास पालकमंत्री गिरीश बापट, जलसंधारणमंत्री राम शिंदे, खासदार संजय काकडे, अनिल शिरोळे, महापौर मुक्ता टिळक, पोलीस आयुक्त रश्‍मी शुक्‍ला, शिक्षण महर्षी पी. ए. इनामदार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
राज्यात नुकत्याच झालेल्या निवडणुकीत तंबोली जमातचे अनेक मान्यवर विविध पदावर विराजमान झाले. त्यांचा सत्कार यावेळी मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. यामध्ये बार्शीचे नगराध्यक्ष ऍड. आसिफ तांबोळी, पाणीपुरवठा सभापती सांगोला रफीकभाई तांबोळी, नगरसेवक हाजी अल्ताफशेठ तांबोळी, असगीरभाई तांबोळी, फेरोजभाई तांबोळी, तस्लिम इरफान शेख, रुबीना तांबोळी, बाबामिया तांबोळी आदी मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)