अंजली रानवडेने सुवर्ण पदक पटकावले

चिंचवड- येथील प्रतिभा कनिष्ठ महाविद्यालयात अकरावी विज्ञान शाखेतील अंजली रानवडे हिने हरियाना कुरुक्षेत्र येथे दि. 21 ते 24 नोव्हेंबरला झालेल्या 23 व्या राष्ट्रीय रोड सायकलिंग स्पर्धेत सब ज्युनिअर गटात सुवर्ण व ब्रांझ पदक पटकावले. तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल कमला शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. दीपक शहा, प्राचार्य डॉ. बाबासाहेब सांगळे, उप प्राचार्य डॉ. जयश्री मुळे, मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरीया, प्रतिभा शिक्षण शास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रोर्णिमा कदम, प्रतिभा कनिष्ठ महाविद्यायलयाच्या उप प्राचार्य डॉ. वनिता कुऱ्हाडे, क्रीडा विभाग प्रमुख शबाना शेख, क्रीडा शिक्षक दर्शन गंधे व कर्मचाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या.

अंजली रानवडे ही चिंचवडगाव परिसरात रस्टन कॉलनीत राहत असून लहानपणापासूनच तिला सायकलिंगची आवड होती. राष्ट्रीय रोड सायकलिंग अजिंक्‍यपद स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ प्रा. संजय साठे यांनी जाहीर केला होता. त्यात सब ज्युनिअर गटातील स्पर्धेसाठी अंजली रानवडे हिची निवड केली होती. निवड समितीने दाखविलेला विश्‍वास सार्थ ठरवत तिने असामान्य कामिगरी केली आहे. महाराष्ट्रातून सब ज्यूनिअर गटात पुणे, क्रीडा प्रबोधिनी, कोल्हापूर येथील स्पर्धकही सहभाग झाले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)