अंजली दमानियांसोबत किळसवाणा प्रकार

मुंबई : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आपल्याला वेगवेगळ्या नंबरवरुन अश्लील फोन येत असल्याचा आरोप केला आहे. सार्वजनिक ठिकाणी पत्रक चिकटवून आपला क्रमांक जाहीर करण्यात आल्याचा आरोप दमानियांनी ट्विटरवरुन केला आहे.

‘हे अत्यंत किळसवाणं आणि राजकारणी कुठल्या थराला पोहचू शकतात याचं घाणेरडं उदाहरण आहे. गेल्या तीन दिवसांपासून ओंगळवाण्या माणसांकडून मला नको त्या वेळी फोन येत आहेत. या व्यक्ती जळगाव, भुसावळ, सुरत, गोरखपूरमधील आहेत. नुकताच मला भुसावळला जाणाऱ्या पॅसेंजरमधून फोन आला. ही ट्रेन आता चाळीसगावला आहे’ असे ट्वीट अंजली दमानिया यांनी केले आहे.

ट्वीटमध्ये जोडण्यात आलेल्या फोटोमध्ये एक पत्रक दिसत आहे. ‘अंजली से खट्टी मिठी बाते करो. फ्री फ्री फ्री’ असे लिहून त्यापुढे अंजली दमानिया यांचा मोबाईल नंबर लिहिण्यात आला आहे. अंजली दमानिया यांनी रेल्वे मंत्रालय, मंत्री पियुष गोयल, मुंबई पोलिस आणि पोलिस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांना ट्वीटपुढे मेन्शन केले आहे. रेल्वे मंत्रालयाकडून या प्रकरणाची तात्काळ दखल घेण्यात आली असून मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे यांना कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)