अंजली दमानियांचे सुपारी घेण्याचे उद्योग- खडसे

अब्रुनुकसानीच्या दाव्या दाखल करणार

भुसावळ – अंजली दमानियांचे वक्तव्य म्हणजे एक प्रकारे सुपारी घेतल्याचे उद्योग असल्याचे मत माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी व्यक्त केले आहे. आपल्यावर बिनबुडाचे आरोप करणाऱ्या दमानिया यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचेही खडसे यांनी म्हटले आहे.
रावेर येथे न्यायालयीन कामकाजानिमित्त आलेल्या दमानिया यांनी खडसेंवर शरसंधान साधत भुजबळ, कल्पना ईनामदार व खडसेंमधील लिंक तीन दिवसात ओपण करणार असल्याचे सुतोवाच केले होते. खडसे यांनी आपल्याविरुद्ध एकही खटला दाखल केला नाही कारण तसे केले असते तर ते जेरीस आले असते, असेही दमानिया म्हटल्या होत्या. त्यांच्या या वक्‍तव्याला उत्तर देताना “माझ्यावर आरोप केल्याने सहज प्रसिद्धी मिळते हे अंजली दमानिया यांना ठावूक असल्याने त्यांची नाहक बडबड सुरू आहे. त्यापेक्षा त्यांनी न्यायालयात आपले म्हणणे मांडून पुरावे द्यावे कारण आता चांगली संधीदेखील त्यांना आहे.’ असे खडसे म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)