अंजनगावात सुनंदा पवार यांच्या हस्ते वृक्षारोपण

सोमेश्‍वरनगर- अंजनगाव (ता. बारामती) येथे जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार यांच्या परिवर्तन पर्यावरण अभियान या संकल्पनेतून ग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्‍वस्त सुनंदा पवार यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार यांनी बारामती तालुक्‍यात 61 हजार रोपे लावण्याचे परिवर्तन पर्यावरण अभियान हाती घेतले आहे . या अभियानाचा दुसरा टप्पा नुकताच पार पडला. यावेळी जळगाव, सोनवडी, अंजनगाव या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर सोमेश्वर विद्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सुनंदा पवार म्हणाल्या की, उद्याचा भविष्यकाळ तुमचा आहे. त्यामुळे तुम्हीच तो सुंदर बनवला पाहिजे. केवळ खड्ड्यात वृक्ष लावून आपली जबाबदारी संपत नाही तर तेथून पुढे खरी जबाबदारी आपली असते. प्रत्येकाने झाड किमान पाच फूट उंचीचे होईपर्यंत काळजी घेतली पाहिजे. वृक्षांनी पर्यावरणाचा समतोल साधला जातोच शिवाय गावाच्या सौंदऱ्यात ही मोठी भर पडते. विद्यार्थ्यांनी ठरवले तर माळरानात ही नंदनवन फुलू शकते. यावेळी सोमेश्‍वर साखर कारखान्याचे संचालक दादासाहेब मोरे, अंजनगावचे सरपंच दिलीप परकाळे, बारामती तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उपाध्यक्ष मिलींद मोरे, सोमेश्‍वर विद्यालयाचे मुख्याध्यापक वाय. जी. चव्हाण, बारामती तालुका शिक्षकेतर संघटनेचे अध्यक्ष संजय वाबळे, हनुमंत वायसे, संजय परकाळे उपस्थित होते. सुनंदा पवार यांना नेहमीच विद्यार्थ्यांत रमायला आवडते. वृक्षारोपणासाठी व झाडांना पाणी घालण्यासाठी ही त्यांनी विद्यार्थ्यांनाच पुढे घेतले. वृक्षारोपण झाल्यानंतर ही त्यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला. शिवाय त्यांनी कृषी विज्ञान केंद्र व शारदानगरचे संकुल पाहण्याचे निमंत्रण दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)