अंगावर घाण टाकून पाच लाख लंपास

पिंपरी – कामगारांचे पैसे देण्यासाठी बॅंकेतून काढलेली रक्कम घेऊन जात असताना अज्ञात चोरट्यांनी अंगावर घाण टाकून पैशांची बॅग पळवून नेली. ही घटना शनिवारी (दि.1) दुपारी एकच्या सुमारास वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवार चौकात घडली.

गुरेन ईश्वर वर्मा यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-Ads-

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कामगारांचे पैसे देण्यासाठी बॅंकेतून पाच लाखांची रोकड काढण्यात आली होती. चोरट्यांनी पाळत ठेऊन पैसे काढणाऱ्या व्यक्तीच्या अंगावर घाण टाकली. घाण पुसत असताना या संधीचा फायदा घेऊन चोरट्यांनी पैशांची बॅग चोरुन नेली. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. घटनेची माहिती मिळताच वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजवरुन चोरट्यांचा तपास सुरू केला आहे. चोरट्यांना पकडण्यासाठी वाकड पोलीस ठाण्यातील तपास पथक रवाना झाले आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)